पुरंदर रिपोर्टर Live
आडाचीवाडी | पुरंदर
निसर्गाच्या सानिध्यात व नऊ डोंगराच्या कुशीत बसलेले केवळ ८०० लोकसंख्या व १५० ते २०० चं घरेअसलेले पुरंदर तालुक्यात एक छोटसं व ‘टुमदार’ गाव म्हणजे आडाचीवाडी होय. या गावात बोलक्याभिंती, १५ हुन अधिक खुले पानंद रस्ते, वातानुकुल व अत्याधुनिक जिम, वीजवर्धक यंत्र, जलयुक्त शिवार, बंदिस्त गटार योजना व फिरण्यासाठी नाना नानी पार्क अशा विविध योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. या विविध विकासकामांमुळे गावाचा डंका जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात गाजला आहे.
वाल्हे (ता. पुरंदर) गावाच्या पश्चिमेला ३ किलोमीटर अंतरावर आडाचीवाडी हे गाव आहे. या गावाच्यासभोवताली मल्हारदरा, यमुनकी, तळजरा, कुंदार बामनदारा, दरा, पिंपळदरा, पानदरा व राळरास असेनऊ डोंगर आहेत. या गावाचे सुपुत्र व सध्या राजगड येथे निवासी उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरतअसलेले संदेश शिर्के यांनी गावाचा कायापालट करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. शिर्केयांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध संस्थांकडून सीएसआर फंडा उपलब्ध करून दिला आहे. त्यातच नागरिकांनीही मोफत श्रमदान व लोकवर्गणीतून गावाला सर्वोतोपरी मदत केली आहे.
गावाने घेतलेले निर्णय..?
शेतीमालाची वाहतूक करणे सोयीचे जावे, शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढावा आणि त्यामाध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनाचा आर्थिक स्तर उंचवावा, यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेयांनी पुढाकर घेत राज्यात पाणंद रस्ते खुले करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला प्रतिसाददेत आडाचीवाडी गावकऱ्यांनी सामंजस्याने भूमिका घेतली. आणि गावातील पंधरा पाणंद रस्ते खुले झालेआहेत. या रस्त्यांची सातबारा उताऱ्यावर नोंद घेतली. काही रस्त्यांवर क्राँकिटीकरण करून दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली आहे. रस्त्यांना महापुरुषांची नावे आणि सांकेतिक क्रमांक देणारी आडाचीवाडीही महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे.
दरम्यान, ग्रामसभेमध्ये सर्वानुमते ठराव करून रस्त्यांची नोंद ७/१२ उताऱ्यावर घेण्यासाठी सर्व रस्ते ज्यासर्व्हे नंबरमधून जातात, त्या ४३२ जमिनींच्या उताऱ्यावरील इतर अधिकारांत ‘ग्रामस्थांची वहिवाट’अशीनोंद घेण्यात आली आहे. शेतीमालाची वाहतूक करणे सोयीचे जावे, यासाठी रस्त्यांचे सिमेंटक्राँकिटीकरणदेखील करण्यात आले आहे. जेणेकरून भविष्यात या रस्त्यांवर अतिक्रमण होऊ नये आणिकायमस्वरूपी खुले राहावेत, हा त्यामागचा उद्देश आहे. या गावात सध्या अनेक विविध विकास कामे सुरुआहेत.
आडाचीवाडी गाव हे महाराष्ट्र राज्यासाठी “आदर्श गाव” म्हणून गणले जाण्याची शक्यता आहे, कारणतेथे महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानाद्वारे गावाचा सर्वांगीण विकास साधला जाईल, जेणेकरून आडाचीवाडी हे राज्यभरातीलगावांमध्ये प्रथम क्रमांकावर येऊ शकेल, असे गावातील नागरिकांनी ठरवले आहे. तसेच यासाठीगावातील राजकीय नेते, शेतकरी, महिला व तरुणवर्ग हात झटकून कामाला लागले आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वीजवर्धक यंत्र
गावात दरवर्षी विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे एखादी दुर्घटना घडू नये. यासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून वीजवर्धक यंत्र बसविले आहे. या यंत्रामुळे गावाच्या 1 किलोमीटरच्यापरीघामध्ये वीज पडणार नाही. गावातील प्रत्येक व्यक्ती खारीचा वाटा उचलून श्रमदान करीत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे.


0 Comments